Share

“हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त राज ठाकरे”, मुख्यमंत्र्यांच्या सभेवर अमेय खोपकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (८ जून) औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याबाबत मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही औरंगाबाद येथे सभा घेतली होती. मात्र सध्या सभेच्या गर्दीवरून विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना निशाण्यावर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवरच मनसे नेते अमेय खोपकर यांनीही टोला लगावला आहे.

“हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त आणि फक्त राज ठाकरे! मुख्यमंत्री यांची सभा बघा मागे सर्व खुर्च्या आणि उभा राहायला जागाचं जागा. सभा सुरू असताना लोक घराकडे रवाना, नाद करायचा पण मनसेचा नाही.जय हिंदुराष्ट्र”, असे ट्वीट करत अमेय खोपकर यांनी सभेचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

दरम्यान “शहराचं नामकरण मी आताही करू शकतो. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल? त्यामुळे आधी शहराचा कायापालट केला जाईल, त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल.”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!