मुंबई: राज्याच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे घटक पक्षाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना डावलण्यात आले आहे. भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने नारळ दिला. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपला सवाल केला आहे.
शिवसेनेने विधान परिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन नवे चेहरे दिले आहेत. भाजपाने पुन्हा तेच नर्मदेचे गोटे समोर आणले. दरेकर, लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे वगैरे लोक त्यात आहेत. पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या भाजपामधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही. असा टोला संजय राऊत यांनी सामनातून लगावला आहे. तसेच राज्यसभेचा तिढा सुटला तरी २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होणार व दोन्ही बाजूंसाठी ही कठोर परीक्षा असल्याचे बोलले जाते. संसदीय लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीचे कौतुक करायचे की ही गुप्त पद्धती संकट समजायचे? असा पेच अनेकदा निर्माण होतो. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आधी नामांतर औरंगाबादचे मग विमानतळाचे”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका
- “हिंदुंचा खरा नेता म्हणजे फक्त राज ठाकरे”, मुख्यमंत्र्यांच्या सभेवर अमेय खोपकरांची टीका
- “फडणवीस सरकारने केलेल्या कामांना आपल्या नावाच्या पाट्या…”, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा…”, निलेश राणेंचा खोचक टोला
- “…हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”, अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

