Share

केंद्र सरकारने आज कोरोना संकट समयी देशवासियांसाठी घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय…

Published On: 

नवी दिल्ली : करोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाउन घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशातील ८ कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे.

15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या व 100 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांमधील कर्मचारी व मालकांच्या वाटणीचे प्रत्येकी 12% (एकूण 24%) कर्मचारी भविष्य निधी (EPF) चे योगदान पुढील 3 महिन्यांसाठी सरकार भरणार आहे.

बांधकाम क्षेत्रातील सुमारे 3.5 कोटी नोंदणीकृत असंघटित कामगारांसाठी लेबर सेस फंडातून थेट खात्यात रक्कम देण्याविषयी राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत

देशात कार्यरत असणाऱ्या 63 लाख बचत गटांना राष्ट्रीय अजीविका मिशनच्या माध्यमातून 10 लाख रुपयांऐवजी आता 20 लाख रुपये कर्ज मिळणार आहेत

सफाई कर्मचारी, नर्सेस, तंत्रज्ञ, डॉक्टर यांचा विशेष विमा उतरवला जाणार. सरकारी सेवेतील सुमारे 22 लाख आरोग्य सेवा देणाऱ्यांचा यात समावेश. त्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!