🕒 1 min read
पंजाब : दरम्यान काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आज पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये पार पडला. आज याठिकाणी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह 9 मंत्री करोडपती आहेत. ते कोणते? पाहूया सविस्तर..
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह सात मंत्र्यांवर खटले –
मंत्रिमंडळातील 11 मंत्र्यांपैकी सात जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. मान यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत केल्याचा आरोप आहे. खटल्याचा सामना करणाऱ्या सात मंत्र्यांपैकी पाच मंत्र्यांवर प्रत्येकी एक खटला आहे. त्याच बरोबर लाल जीत सिंग भुल्लर विरुद्ध 3 आणि गुरमीत मीत हेअर विरुद्ध 5 खटले चालू आहेत.
मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री करोडपती –
मंत्रिमंडळातील 10 पैकी आठ मंत्री कोट्यधीश आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान हेही करोडपती आहेत. म्हणजेच मंत्रिमंडळात एकूण 9 कोटीपती मंत्री आहेत. फक्त लालचंद आणि गुरमीत मीत हेअर हे मंत्री आहेत जे करोडपती नाहीत. लालचंद हे मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री आहेत. त्यांच्याकडे केवळ 6.19 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर गुरमीत मीत हेअरकडे 44.06 लाखांची संपत्ती आहे. ब्रम शंकर हे मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 56 वर्षीय शंकर यांची एकूण संपत्ती 8.56 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
