Share

Anil Deshmukh Bail | सत्र न्यायालयाचा अनिल देशमुखांना धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने अनिल देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रत्यक्षात 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. दरम्यान याच प्रकरणात, विशेष ईडी न्यायालय देखील दुपारी 2:30 वाजता तिघांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. देशमुख यांनी हे आरोप फेटाळले होते पण मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद सोडावे लागले होते.

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे वैयक्तिक सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप दाखल केले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेले देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून मनी लाँड्रिंग प्रकरणात ते शहरातील आर्थर रोड तुरुंगात आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे.

तसेच या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने देशमुख, त्यांचे सहकारी पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले होते आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस कर्मचारी सचिन वाझे यांना सेवेतून बडतर्फ केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!