मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण चाहत्यांसाठी अजून एक बातमी समोर येत आहे. या मालिकेतील अजून एक कलाकार मालिका सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या काही एपिसोडमध्ये दिसला नाही. यामुळे तो मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता हे किती खर आहे हे माहीत नाही, पण लवकरच त्याबाबतही महिती येईल.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. सगळ्यात पहिल्यांदा टप्पुची भूमिका भव्य गांधीनी साकारली होती. त्याने देखील हा शो सोडला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

