Share

“…परंतु दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना…”, प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तुम्ही मास्का का वापरत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता, त्यावर संजय राऊतांनी ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) फॉलो करतो’, असे उत्तर दिले होते. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘परंतु दुसऱ्याकडे बोट दाखवताना अजूबाजूला मास्क न लावलेले अनेक लोक असतात त्यांच्याबाबतही भाष्य करायला हवे’, असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावला आहे.

दरेकर ट्विट करत म्हणाले, ‘मास्क वापरण्याबाबत सगळ्यांना आग्रह आहे, परंतु दुसऱ्यांकडे एक बोट दाखवत असताना आपल्या आजूबाजूला मास्क न लावलेले अनेक लोक असतात त्यांच्याबाबत ही भाष्य करायला हवे.’ असे दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, खासदार संजय राऊत नाशिक येथे आले असता पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्याला सांगतात, मास्क लावा. मात्र ते स्वत: मास्क लावत नाहीत. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) मास्क लावतात. मात्र सर्वोच्च नेते प्रधानमंत्री तेच मास्क लावत नाहीत. आम्ही त्यांना फॉलो करतो. त्यांनी आधी मास्क लावावा. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असेही राऊत यावेळी म्हणाले.

देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असताना सर्व राज्यांना तयारी करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी मास्क लावत नाही म्हणून आम्ही देखील मास्क लावत नाही असे विधान करून मोदींना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!