Share

महाविकास आघाडीला हायकोर्टाचा दणका! नवाब मलिकांना दिलासा नाही

Published On: 

मुंबई : नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका दिवसासाठी जामीन मिळावा, अशी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळल्यानंतर नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान होत आहे.

याआधी गुरुवारी विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून लावली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती प्रकाश डी नायक यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मलिक यांना जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या योग्य खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यास सांगितले. यासोबतच न्यायालयाने मलिक यांना याचिकेत सुधारणा करण्यास सांगितले आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्याची याचिका दुपारी दीड वाजता न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ठेवली जाणार आहे.

गुरुवारीच विशेष न्यायालयाने मलिक आणि राष्ट्रवादीचे दुसरे नेते अनिल देशमुख यांची एका दिवसासाठी तुरुंगातून सुटका करण्यास नकार दिला होता. महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष न्यायालयात दोन्ही नेत्यांच्या याचिकांना ईडीने कडाडून विरोध केला होता. अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंग यांनी लोकप्रतिनिधी कायद्यातील एका कलमाचा हवाला देऊन कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे सांगितले होते.

मुंबई अंडरवर्ल्ड, फरार डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिकला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!