Share

“AIMIM च्या दोन मतांसाठी शिवसेनेवर…” राम सातपुतेंचे खोचक ट्वीट

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील सहा राज्यसभेच्या जागांवर होत असलेल्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM चे दोन आमदार महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ मतदान करतील. पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी मतदानापूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली.

दरम्यान, भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेने देखील शिवसेनेवर निशाणा साधला. “AIMIM च्या दोन मतांसाठी शिवसेनेवर पदर पसरायची वेळ आली. अजून काय काय करायला लावेल यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची कुणास ठाऊक”, असा टोला भाजप आमदार राम सातपुते यांनी लगावला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “राज्याची शोभा होईल, अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे”, असे ट्वीट गजानन काळे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन दशकांहून अधिक काळात प्रथमच सात उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सत्ताधारी शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार उभे केले आहेत. विरोधी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक असे तीन उमेदवार उभे केले आहेत. सत्ताधारी आघाडीतील भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढ़ी यांना प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!