मुंबई: राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी भाजप, राष्ट्रवादी पक्षातील आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले असून मतदानास सुरुवातही झाली आहे. भाजप तसेच मविआ सरकारमधील नेत्यांकडून आतापासूनच दावे केले जात आहे. तरी सायंकाळपर्यंत निकाल लागणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
“झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान निवडणूकीपूर्वी काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले मात्र हे चूकीचे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मविआचे चारही उमेदवार विजयी होणार असे राऊत म्हणाले आहेत. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
झुठी शान के परिंदे ही
ज्यादा फडफडाते हैं…!
बाझ की उडान मे
कभी आवाज नही होती..!!
जय महाराष्ट्र..!!! pic.twitter.com/BpWAngwY2U— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार अनिल बोंडे ( Anil Bonde) यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करत मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे. तसेच भाजपाचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होणार कारण देवेंद्र फडणवीस यांचा धाक असल्याचेही बोंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनिल बोंडे यांनी नेमका कुणाला टोला लगावला याबाबत तर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, हवामान विभागाने दिली माहिती
- “चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे गिफ्ट सायंकाळपर्यंत…”, अमोल मिटकरींचा टोला
- “भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार”, इम्तियाज जलील यांची ट्वीट करत माहिती
- “भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा…”, अमोल मिटकरींचा टोला
- Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास


