मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. आता याबाबतीती एक मोठी बातमी समोर येत आहे. लॉरेन्स बिश्नोई च्या भावाने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, सलमान खानने कळवीट हत्याप्रकरणामध्ये माफी मागितल्यास आम्ही त्याला माफ करू असा खुलासा केला आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ राजवीर सोपु म्हणाला, सलमान खानने कळवीट मारून मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतो की आम्ही पुढे सलमानचा कार्यक्रम करणार. पण जर काळवीट हत्याप्रकरणात सलमानखानने माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करू असं देखील लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ राजवीर सोपु म्हणाला आहे.
नेमकं काय आहे पत्र प्रकरण?
सलमान खानचे वडील मॉर्निंग वॉकला गेले असता ते बसतात त्या बाकड्याजवळ धमकीचे पत्र बॉडीगार्डला मिळाले. त्या पत्रामध्ये तुमचा पण सिद्धू मुसेवाला करू अशी धमकी देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमान खानचा जवाब नोंदवला आहे. यावेळी लॉरेन्स बिश्नोईवर संशय येत असल्यामुळे तिहार तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यात आली, मात्र याबाबत मला काहीच माहित नाही असं उत्तर बिश्नोईने पोलिसांना दिले.
महत्वाच्या बातम्या :


