Share

“निजामाची अवलाद AIMIM ची मदत घेऊन जनाची नाही पण…”, ‘मनसे’ची महाविकास आघाडीवर जहरी टीका

Published On: 

मुंबई: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत मोठी माहिती दिली आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे इम्तियाज जलील (Imtiaz Jali)यांनी म्हटले आहे. यावरूनच मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“”राज्याची शोभा” होईल अशी ही राज्यसभा निवडणूक सुरू आहे. जनता असंख्य अडचणींचा सामना करत असताना सत्ताधाऱ्यांचा पंचतारांकित निवडणुकीचा खेळ सुरू आहे. त्या निजामाची अवलाद एमआयएमची मदत घेऊन जनाची नाही पण मनाचीही महाविकास आघाडीने सोडली आहे. तर शिवसेनेचं नकली, ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं आहे.”, असा टोला गजानन काळे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान “भाजपला हरवण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील.”, असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास व्हावा यासाठी आम्ही काही अटी ठेवल्या असून एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी तसेच महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आले आहे.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!