Share

“…तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते”, छगन भुजबळ यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मत फुटू नये, यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. येत्या १० जून रोजी यासाठी निवडणूक पार पडणार असून या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रत्येकी दोन जागा व भाजप पक्षाच्या चार जागा रिक्त आहेत. एकूण दहा जागांसाठी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र भाजपने चारऐवजी पाच उमेदवार जाहीर केले असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागेल. असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीतही एक उमेदवार अधिक असल्यामुळे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. या दोन्ही निवडणुकींसंदर्भात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष व मित्र पक्षांची बैठक मुंबई येथे पार पडली आहे. या बैठकीत आम्ही सर्वजण एकत्र राहून राज्यसभेवरील आमचे उमेदवार निवडून आणू. तसेच विधान परिषदेवर सुद्धा आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अशी कोणतीही घटना घडणार नाही. असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!