Share

“पंकजा मुंडेच्या तिकिटासाठी देवेंद्र फडणवीसांसह सगळ्यांनी प्रयत्न केले, पण…” – चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यावेळेस ही डावलण्यात आले आहे. राज्यसभेनंतर सलग आता विधान परिषदेतही त्यांना डावलण्यात आलं आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे यांच्या तिकिटासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनीच खूप प्रयत्न केले. पण आमच्या पक्षश्रेष्ठीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंकजांना आज उमेदवारी मिळाली नसेल तरीही त्यांना भविष्यात संधी दिली जाईल. त्यांचा पुन्हा विचार करण्यात येईल.”

यामुळे आता पंकजा मुंडे यांना राज्यातल्या नेतृत्वामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही की, केंद्रीय स्थरावरून त्यांच्यावर नाराजी आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी एका सदस्याला २७ मतांची गरज असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत. एक जागा दोन्हीकडून जास्त लढवण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!