Share

“नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे”, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले असून याबाबतीत त्यांनी माफीही मागितली आहे. आता यावरच राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे. आपल्या संविधानात प्रत्येक धर्माचा मान राखावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माबाबत कोणीही अद्वातद्वा बोलू नये.”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

तसेच एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याची शिक्षा विदेशात राहणाऱ्या वा विदेशात आपले उत्पादन विकणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना मिळू नये, त्यांना त्रास होऊ नये. एखाद्या पक्षातील माथेफिरू लोक केवळ प्रसिद्धीसाठी अशी चुकीची वक्तव्ये करतात. भारत सरकार मुस्लिम देश, मुस्लिम संघटना यांच्याशी चर्चा करून मार्ग काढेल अशी आशा वाटते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!