Share

BJP | भाजप 10 लाख लोकांचा पाठींबा गमावणार? काय आहे प्रकरण ?

Published On: 

मुंबई :  केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असतांनाही सैनिकांच्या प्रश्नांकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी सैनिक आघाडीने केला आहे. त्यामुळे राज्यातील 10 लाख लोकांचा पाठींबा भाजप गमावणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बैठक घेणार आहेत.

भाजप सोबत असणारी माजी सैनिक आघाडी पक्षातून बाहेर पडली तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण यात 10 लाख आजी-माजी सैनिकांचा समावेश आहे. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांद्वारेही भाजपाला डावलंल जाण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील माजी सैनिक भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आमचा परिवार खंबीरपणे उभा आहे. पण कोणतेही प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची माहिती भाजप माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी एक वाजता माजी सैनिकांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!