🕒 1 min read
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काल पत्रकार परिषद घेत संभाजीराजे छत्रपती यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत, असे सांगितले. शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट ठेवल्याने संभाजीराजेंना राज्यसभेवर जात आले नाही. छत्रपती घराण्याने कोणत्याही पक्षात प्रवेश करणे हे योग्य नसल्याने, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केले नसल्याचे सांगितले जातंय. तर राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना प्रवेश करण्यास काय अडचण होती, असा प्रश्न शिवसेनेकडून केला गेला होता. आता या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी मोठा गौप्य्स्फोट केला आहे.
संभाजीराजेंना अपक्ष उमेदवार म्हणून उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांची होती, असे शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले आहे. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणे हा छत्रपती घराण्याचा अवमान झाला असं म्हणता येणार नाही, असे देखील ते म्हणाले आहेत. संभाजीराजें यांनी माघार घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे वडील शाहू छत्रपती महाराज यांनी भाष्यं केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असे म्हटले आहे.
संभाजीराजे यांनी जानेवारीपासूनच राज्यसभेसाठी प्रयत्न सुरु केले होते. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच यावेळी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, बहुजन समाजाच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच भाजपनं संभाजीराजे यांना अपक्ष लढवण्याची खेळी केली होती. असा आरोप शाहू महाराजांनी जाहीरपणे केला.
फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती. तेव्हा त्यांच्याकडे दोनच पर्याय होते, एक तर स्वबळावर पुढे जाणं, दुसरं म्हणजे इतर पक्षांचा पाठिंबा घेणे. भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही त्यांना भाजपची ऑफर स्वीकारू नका म्हणून सांगितलं. पण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. त्याबाबत संभाजीराजेंनी आमच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांना आता उमेदवारी नाकारली गेली असेल तर त्यात छत्रपती घराण्याचा अवमान झाला असं म्हणता येत नाही, असे स्पष्टीकरण शाहू छत्रपती महाराज यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
