🕒 1 min read
दिल्ली : दिल्ली विधानसभेत गदारोळ होत असताना, अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५८ मते पडली, तर एकही आमदार विरोधात उभा राहिला नाही. उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजप आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात “बनावट खटला” दाखल करण्यात आला होता आणि सीबीआयला त्यांच्या तपासात काहीही आढळले नाही.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. सुमारे 10 राज्यातील आमदार 20 कोटींना विकत घेतले, दिल्लीतही 40 आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. 20 कोटी कमी झाले नसते पण इथे कोणी विकले गेले नाही. ते म्हणाले की, ‘आप’चा एक आमदार तुरुंगात, एक कॅनडात आणि तिसरा ऑस्ट्रेलियात आहे. यानंतरही आमच्या बाजूने 58 मते पडली आहेत.
तीन आमदार उपस्थित राहिले नाहीत-
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाकडे एकूण 62 आमदार आहेत. दोन देशाबाहेर आहेत, एक तुरुंगात आहे. चौथा सदस्य हा सभागृहाचा अध्यक्ष असून आमच्या बाजूने एकूण 58 मते पडली आहेत. प्रत्यक्षात पक्षाचे तीन आमदार विधानसभेला उपस्थित राहू शकले नाहीत.
संगम विहार प्रकरणाबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, मुलीला सर्वोत्तम उपचार दिले जातील आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. ते म्हणाले की, एका अहवालात दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचे म्हटले आहे, एलजी आणि केंद्र सरकारने यावर कारवाई करावी.
महत्वाच्या बातम्या :
- Jharkhand | झारखंडमध्ये राजकीय संकट! मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा देणार?, मंत्रिमंडळाची बोलावली बैठक
- Central Government | भारत सरकार चीन देशावर करणार डिजीटल स्ट्राइक?, केंद्र सरकारने केला खुलासा
- राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा सवाल, अन् तानाजी सावंत एक शब्दही बोलले नाहीत ; ऑडिओ क्लिप व्हायरल
- Abdul Sattar | गळतं घर पाहून अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला घर बांधून देण्याचं आश्वासन
- Dasara Melawa 2022 | बाळासाहेबांच्या वारशाची लढाई! दसरा मेळाव्यावरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे का भिडले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
