Share

Abdul Sattar | गळतं घर पाहून अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला घर बांधून देण्याचं आश्वासन

Published On: 

जळगाव : एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पाऊस पडल्यामुळे त्या शेतकऱ्याचे घरं गळत होते. हे पाहून अब्दुल सत्तार यांनी त्या शेतकऱ्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी दिलं हे आश्वासन-

शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करत त्यांनी त्या ठिकाणी जेवणही केले. रात्रीच्या वेळेस पावसाच्या पाण्याने घर गळू लागलं. शेतकऱ्याच्या घराची अशी अवस्था अब्दुल सत्तार यांना पहावली नाही. सत्तारांनी तत्काळ माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं ते म्हणाले. त्यानंतर लगेचंच उक्तीप्रमाणे गुरुवारी म्हणजेच आज सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरु झालं आणि त्याचं भूमीपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केल असल्याचं समजतं आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार घरं-

मेळघाटमधील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी अब्दुल सत्तारांनी येथेच्छ पाहुणचार घेतला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. या दोन्ही शेतकऱ्यांना घरं मिळणार आहेत.

दरम्यान, एक दिवस बळीराजासोबत या उपक्रमासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांजवळचे आमदार चंद्रकात पाटील यांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळाले आहे, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!