Share

mahesh tapase | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत – महेश तपासे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांनी अशी वक्तव्य केली होती की महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 200 पेक्षा अधिक मतं मिळतील. याचाच अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील मत फुटतील आणि ती एनडीएला मिळतील.

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या वक्तव्यांवरून आज महेश तपासे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “राष्ट्रपती निवडणुकीत झालेल्या मतदान वरून हे स्पष्ट झालं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची मतं फुटली नाहीत. हे पाहून खूप बरं वाटलं. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची सर्व मतं मिळाली. मात्र यावरून हे स्पष्ट होत आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील भाजप करत आहे”, असा आरोप त्यांनी यावेळी केला

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!