महाराष्ट्र देशा डेस्क : दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आज ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांची नावे आज नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आली. मध्य प्रदेशला मोस्ट फ्रेंडली आणि उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट म्हणून निवडण्यात आले आहे. तर अभिनेता अजय देवगण याच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
अनेक चित्रपट, अभिनेते आणि अभिनेत्री यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे मानकरी बनले आहेत. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या तान्हाजी: द अनसंग वॉरियरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दाक्षिणात्य अभिनेता सुर्याच्या ‘सोराराई पोत्रू’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अपर्णा बालमुरली यांना सूरराई पोत्रूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. बिजू मेनन यांना सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि लक्ष्मी प्रिया चंद्रमौली यांना या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार ‘द लॉजेस्ट किस’ ला देण्यात आला. ‘ॲडमिट’ला हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट संशोधनपर चित्रपट ‘द सेव्हियर: ब्रिगेडियर प्रीतम सिंग’ आणि सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार ‘बॉर्डरलँड’ला मिळाला. त्याचबरोबर ‘पर्ल ऑफ द डेझर्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा पुरस्कार तुलसीदास ज्युनियर, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार निचकेच बर्वे, महेश शेरला (तान्हाजी) यांना, तर सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन पुरस्कार अनीस नाडोनी आणि श्रीकर प्रसाद (कॅपेला) यांना मिळला. तसेच शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम (तमिळ) यांना सर्वोत्कृष्ट संपादनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sudhir Mungantiwar | आदिवासी बांधवांच्या नृत्यात थिरकले सुधीर मुनगंटीवार, पाहा VIDEO
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंचं जेवढं वय त्यापेक्षा जास्त काळ आम्ही राजकारणात; रामदास कदमांचा टोला
- Radhakrishna patil l महाराष्ट्रातील दोन्हीही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहेत – राधाकृष्ण विखे पाटील
- Samantha prabhu | “मला आणि नागाला एका खोलीत बंद केले तर…”; समंथा रुथ प्रभू काय म्हणाली वाचा
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक


