🕒 1 min read
अमरावती : मुंबई येथील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर होताच, भाजप नेत्या उमा भारती यांनी शिवसेनेला टोला लगावणारं ट्वीट केले आहे. हे ट्वीट सध्या चर्चेत असताना पाहायला मिळत आहे.
उमा भारती यांनी राणा दाम्पत्याच्या बाजूने ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, “नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयातून सुटका झाल्याने समाधान लाभले आहे. त्यांच्या कर्तुत्वावर मला गर्व आहे. मी श्री उद्धव ठाकरे त्यांच्या सरकारकडून अशी अपेक्षा केली नव्हती.” असे म्हणत ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
1) @navneetravirana एवं @mlaravirana_ysp के रिहाई से मुझे राहत महसूस हुई साथ ही उनके साहस पर मुझे गर्व भी है । मैं श्री उद्धव ठाकरे जी की सरकार से ऐसी अपेक्षा नही करती थी । @OfficeofUT
— Uma Bharti (@umasribharti) May 6, 2022
“शिवसेनेचा जन्म हा बाळासाहेब ठाकरे यांच्या तपातून झाला आहे. सर्व शिवसैनिकांनी विचार करायला हवा की ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची संस्कार आणि परंपरा आहे का तर. हनुमान चालिसा पठण करण्याचा स्थानावरून खासदार नवनीत राणा चुकीच्या असू शकतात. पण हनुमान चालीसा पठण कधीही आणि कुठेही चुकीचं असू शकत नाही”. विविध अटी शर्ती घालून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ समोर होते. अशातच आज भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी ट्विट करून राणा दाम्पत्याला समर्थ दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
