Share

IND vs WI : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा; ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI) जाणार आहे. मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया विंडीजला टक्कर देईल. तीन एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त भारतीय संघ तेथे पाच टी-२० सामने खेळणार आहे. त्रिनिदादमध्ये वनडे खेळण्याव्यतिरिक्त, ब्रायन लारा स्टेडियमवर टी-२० सामने खेळवले जातील.

क्रिकबझच्या मते, त्रिनिदादमध्ये २२, २४ आणि २७ जुलै रोजी वनडे सामने खेळवले जातील. यानंतर, पहिला टी-२० सामना २९ जुलै रोजी नव्याने बांधलेल्या ब्रायन चार्ल्स लारा स्टेडियमवर खेळवला जाईल. पुढील दोन टी-२० सामने १ आणि २ ऑगस्ट रोजी सेंट किट्स आणि नेव्हिसमधील वॉर्नर पार्कवर खेळले जातील. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये शेवटचे दोन टी-२० सामने होणार आहेत.

टीम इंडियाने दोनदा वेस्ट इंडिजला जाऊन फ्लोरिडामध्ये सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये, अमेरिकेने दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले होते. यानंतर, २०१९ मध्ये देखील, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने फ्लोरिडामध्ये खेळले गेले. यावेळी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व निकोलस पूरन करणार आहे. कायरन पोलार्डने आयपीएल २०२२दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

https://twitter.com/sportstigerapp/status/1522599111127891970

भारताचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा जूनमध्ये सुरू होणार आहे. भारतीय संघ २६ जूनपासून डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनी ब्रिटन दौऱ्याला सुरुवात करेल. या मालिकेनंतर, टीम इंडिया प्रथम इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी खेळणार आहे, जी कोरोनामुळे गेल्या वर्षी रद्द करण्यात आली होती. यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!