🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगलेल्या बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,‘बदलते हुए मौसमों का भी खयाल रखता हूं, मगर रगो में भी उबाल रखता हूं. ए जिंदगी तेरा जो भी मायना हो, तेरे रास्तेपर चलते हुए खुद्दारी का भी खयाल रखता हूं’, असे आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
बदलते हुए मौसमों का भी खयाल रखता हूं l
मगर रगो में भी उबाल रखता हूं l
ए जिंदगी तेरा जो भी मायना हो l
तेरे रास्तेपर चलते हुए खुद्दारी का भी खयाल रखता हूं l— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 7, 2022
दरम्यान, यापूर्वी भोंग्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ते म्हणाले होते की,‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है…’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs WI : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा; ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक!
- “काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये…”, अतुल भातखळकरांचा टोला
- “…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी असं काय पाप केलं?”, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा सवाल
- “शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून…”, अजित पवार यांचे वक्तव्य
- IPL 2022 GT vs MI : नशिबच फुटकं..! गुजरातचा फलंदाज ‘अशा’ पद्धतीनं झाला OUT; पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
