🕒 1 min read
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून तेथील बांधकाम पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने महापालिकेला सुनावले आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane ) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“एका पोरा मुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला वाटेल तिकडे काही करत सुटला आहे ज्याची किंमत मुंबईला काही वर्षांनी भरावी लागेल. नाईट लाईफचं नाटक सुरू केलं आज ते नाटक फक्त याच्या मित्रां पुरतच मुंबईत सुरू आहे. दहा फुटाची काम करणार आणि हजार फोटो काढणार पण त्यामागे नुकसान मोठं आहे.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
एका पोरा मुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला वाटेल तिकडे काही करत सुटला आहे ज्याची किंमत मुंबईला काही वर्षांनी भरावी लागेल. नाईट लाईफचं नाटक सुरू केलं आज ते नाटक फक्त याच्या मित्रां पुरतच मुंबईत सुरू आहे. दहा फुटाची काम करणार आणि हजार फोटो काढणार पण त्यामागे नुकसान मोठं आहे. https://t.co/PCrBCn8D0V
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 7, 2022
दरम्यान पवई तलाव परिसरातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झालेले बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय ठाकरे सरकारला मोठा धक्का म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs WI : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा; ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक!
- IPL 2022 GT vs MI : नशिबच फुटकं..! गुजरातचा फलंदाज ‘अशा’ पद्धतीनं झाला OUT; पाहा VIDEO!
- “शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर राज्य चालत असून…”, अजित पवार यांचे वक्तव्य
- “…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी असं काय पाप केलं?”, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचा सवाल
- “काही जणांना फक्त अधिकार कळतात, कर्तव्ये…”, अतुल भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
