Share

IPL 2022 GT vs MI : नशिबच फुटकं..! गुजरातचा फलंदाज ‘अशा’ पद्धतीनं झाला OUT; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. यात मुंबईने रोमहर्षक पद्धतीने बाजी मारली. आयपीएलच्या १५व्या मोसमातील या ५१व्या सामन्यात असे काही घडले जे आतापर्यंत या मोसमात घडले नव्हते. गुजरात टायटन्सचा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन हिट विकेटवर बाद झाला. आयपीएलच्या चालू मोसमात पहिल्यांदाच एखादा फलंदाज हिट विकेटवर बाद झाला आहे. स्पर्धेच्या इतिहासात आता १३ खेळाडू अशा प्रकारे बाद झाले आहेत.

१६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुदर्शन बाद झाला. कायरन पोलार्डचा चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बॅट यष्ट्यांवर आदळली. सुदर्शनने ११ चेंडूत १४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. गेल्या वेळी आयपीएलमध्ये जॉनी बेअरस्टो हिट विकेटवर बाद झाला.

https://twitter.com/EdenWatson17/status/1522628587555520513?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522628587555520513%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsai-sudharsan-dismissed-hit-wicket-against-mumbai-indians-see-the-video-gt-vs-mi-ipl-2022-tspo-1459264-2022-05-07

आयपीएलमध्ये हिट विकेट झालेले फलंदाज:

  • मुसावीर खोटे (मुंबई इंडियन्स), २००८
  • मिसबाह-उल-हक (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), २००८
  • स्वप्नील अनसोडकर (राजस्थान रॉयल्स), २००९
  • रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्ज), २०१२
  • सौरभ तिवारी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), २०१२
  • युवराज सिंग (सनरायझर्स हैदराबाद), २०१६
  • दीपक हुडा (सनरायझर्स हैदराबाद), २०१६
  • डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), २०१६
  • शेल्डन जॅक्सन (कोलकाता नाइट रायडर्स), २०१७
  • रियान पराग (राजस्थान रॉयल्स), २०१९
  • हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स), २०२०
  • जॉनी बेअरस्टो (सनराईजर्स हैदराबाद), २०२१
  • साई सुदर्शन (गुजरात टायटन्स), २०२२

असा रंगला सामना..

या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ६ बाद १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने ४५ धावा केल्या. टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. कर्णधार रोहित शर्माने ४३ धावांची खेळी खेळली. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हार्दिक पंड्याचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ५ गडी गमावून १७२ धावाच करू शकला. शेवटच्या षटकात त्यांना ९ धावांची गरज होती, पण मुंबईकडून डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातकडून वृद्धिमान साहाने ५५, शुबमन गिलने ५२ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने २४ धावा केल्या. मुंबईकडून मुरुगन अश्विनने दोन बळी घेतले

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!