Share

Nilesh Rane: “… आणि फक्त अंधारातच बाळासाहेब आठवतात”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Published On: 

मुंबई : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासह इतर काही आमदारांनी ही पक्षाला रामराम ठोकला. या बंडा नंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सह त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत हे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी मिळावे तसेच सभा आयोजित करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. आदित्य ठाकरे युवाशक्तीचे प्रदर्शन करत राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी भेटत आहेत. आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून सक्रिय राजकारणात आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी मेळाव्यांमध्ये बोलताना अनेक वेळा बंडखोर आमदारांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे खुले आव्हानही आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले आहे.

शिवसेनेत घडलेल्या मोठ्या बंडानंतर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत २६ आणि २७ रोजी सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार असल्याचेही सांगितले आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर मुलाखतीचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यावर आता भाजपचे निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मुलाखतीचे दोन फोटो पोस्ट करत टीका केली आहे.

मुलाखत प्रकाशित होण्यापूर्वी संजय राऊत यांनी त्या मुलाखतीदरम्यानचा एक फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच बाळासाहेब यांची ही प्रतिमा दिसत आहे. याच कारणावरून भाजपच्या निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बांध सोडले. त्यांनी ट्विटरवर संजय राऊत यांनी यापूर्वीच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा फोटो शेअर केला आहे. तर त्याच खाली आताच्या मुलाखतीचाही फोटो जोडलेला आहे. मात्र यापूर्वी घेतल्या गेलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो दिसत नाही आणि मुलं कधी वेळी उजेड असल्याचे दिसत आहे. मात्र आत्ता घेतलेल्या मुलाखतीचा फोटो पाहिला तर त्यामध्ये बाळासाहेबांचाही फोटो दिसतो आणि अंधाराची वेळ असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्याला पकडून निलेश राणेंनी ‘उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात’, अशी टीका केली आहे.

यावेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वतःकडे पद असताना शिवसैनिकांशी चर्चा केली असती तर आज अशा यात्रा काढायची गरज भासली नसती. त्यावेळी तुम्हाला नाईट लाईफ आवडली. त्यावेळी तुम्हाला पटानी आवडली. तेव्हा तुम्हाला शिवसैनिकांची काळजी वाटली नाही. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राचे फक्त नुकसानच केले, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!