नाशिक: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता यावर छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खून केला आहे. 2010 मध्ये कृष्णमूर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते. 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. देशात आणि राज्यात भाजप सरकार होते, फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही. दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळे जण मुखपट्टी लावून घरी बसलो होतो. तुमच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेशसह सर्व राज्य अडचणीत आली आहेत, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे”.
ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही हे पाहून त्यांनी डेटा मागितला, आमचे काम रात्रदिवस सुरू आहे. प्रत्येक कायदा करत असतांना फडणवीसांच सहकार्य मागीतले घरी गेलो. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात पण आम्ही प्रामाणिक पणे काम करत आहोत. आम्हाला सांगा काय करायचे ते सुचवा. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका अशी विनंती देखील छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –


