Share

“मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की…”, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयातून आज (८ मे) डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर नवनीत राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नवनीत राणा म्हणाल्या की,‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल, असेही राणा म्हणाल्या.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नवनीत राणा यांची काल (७ मे) रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तद्पश्चात यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की,‘नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. मात्र, ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनाही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!