🕒 1 min read
पन्हाळा : आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला असेलेला बारामती मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप पक्षाकडून ‘मिशन बारामती’ राबवले जात आहे. यासाठी भाजप पक्षाच्या नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप नेत्यांना सोबत घेत बारामतीचा दौरा केला होता. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचं दिसून येतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजला प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
बारामतीला घेरणं इतके सोप्प नाही, असं म्हणत अजित पवार यांनी भाजप पक्षाला आणि भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे हल्ला केला आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्याठिकाणी अजित पवार उपस्थित होते. मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, बारामतीला घेरणं इतके सोप्प नाही. प्रत्येक जण आपल्या परीने काम करत असतो. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात. शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही.
त्यांना यश मिळण्यासाठी अडीच वर्षं थांबावं लागलं
दरम्यान, दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असं वक्तव्य भाजप पक्षाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होते. हे जगजाहीर होतं. फक्त त्यांना यश मिळण्यासाठी अडीच वर्षं थांबावं लागलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थापनेबद्दल सांगायची गरजच नव्हती, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nashik Accident | झोपेत असलेल्या प्रवाश्यांवर काळाचा घाला! नाशिक येथे पहाटे बस आणि टँकरचा भीषण अपघात
- Ajit Pawar | “मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता, पण उद्धव ठाकरेंच्या मिळत होता”
- Ajit Pawar | “…तर या ही बाबाला घरी जावं लागेल”; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Eknath Shinde | मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या व्हायरल व्हिडीओवर एकनाथ शिंदे म्हणतात…
- Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
