Share

Abdul Sattar | “माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप युती करून सोबत निवडणूका जिंकणार आहेत. तर अशातच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट आणि भाजप युतीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार ?

माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रसामाध्यमांशी सत्तार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सत्तार म्हणाले, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.

तसेच, दिल्लीत आणि मुंबईसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!