Share

पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. पवारांनी मोदींच्या (Narendra Modi)कार्यशैलीचे कौतुक करत मोदींची कार्यशैली पूर्वपंतप्रधानांकडे नव्हती असे म्हटले आहे. तसेच युपीए सरकारमध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरा मंत्री नव्हता जो मोदींशी चर्चा करू शकत होता. असे म्हणत मोदींवर कौतुकाची स्तुतीसुमने उधळली आहेत.

नरेंद्र मोदी यांनी एखादे कार्य करायचे ठाणले की, ते पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. मोदींकडे आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची शैली आहे. अशी शैली पूर्वपंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे नव्हती. एवढेच नाही तर मनमोहन सिंह यांनी सल्ला दिला होता की, तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजकीय रणनीती आखायला नको.तसेच माझ्याशिवाय युपीए सरकारमध्ये अन्य मंत्री नव्हते, जे मोदींसोबत बोलू शकतील, कारण मोदी वारंवार युपीए सरकारवर टीका करत असत.

दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितलं. निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हतं त्यामुळे सेना-भाजपात खूप अंतर वाढलं होतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेल असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!