🕒 1 min read
पुणे : बुधवारी(२९ डिसें.)‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) कार्यशैलीचे कौतुक केले. तसेच नरेंद्र मोदींची कार्यशैली पूर्वपंतप्रधानांकडे नव्हती, असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलत असतांना शरद पवार म्हणाले की,’आपल्या मित्रपक्षांना सोबत घेण्याची पंतप्रधान मोदींची पद्धत वेगळी आहे आणि ती शैली मनमोहन सिंग यांच्यासारख्या माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती’, असे ते म्हणाले. तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजकीय रणनीती आखायला नको. तसेच माझ्याशिवाय युपीए सरकारमध्ये अन्य मंत्री नव्हते, जे मोदींसोबत बोलू शकतील, कारण मोदी वारंवार युपीए सरकारवर टीका करत असत.
दरम्यान, पुढे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार का? या संभाव्य राजकीय परिस्थितीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ‘नेतृत्व करण्याऐवजी सरकारचे नेतृत्व करणार्या व्यक्तीला पाठिंबा आणि मार्गदर्शन करायचे आहे.’ तसेच महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाई संदर्भात विचारण्यात आले असता पवार म्हणाले की, या विषयावर मी पंतप्रधानांशी कधीही बोललो नाही आणि बोलणारही नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
