🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे निवडणुकांंचं वारं घुमू लागलं आहे. अशातच शिवसेना पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक होणार असून, याचसंदर्भात शिवसेनेने मागणी केली असल्याचं समजतं आहे.
काय आहे शिवसेना पक्षाची मागणी ?
शिवसेनेचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहीले आहे. अंधेरी पूर्व मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची मागणी आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार असून, शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे.
तसेच, स्वर्गवासी पतीच्या जागेवर लढणान्या महिलेचा आदर म्हणून आपण अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करून नवदुर्गेच्या महाराष्ट्राची स्त्री सन्मानाची परंपरा कायम ठेवाल आणि अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करून श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना सन्मानाने विधानसभेत पाठवाल हीच भारतीय जनता पक्षाची स्व. रमेश लटके साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल,असं पत्रामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
- Abdul Sattar | “महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर”
- Dengue Prevention | डेंग्यू होण्यापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- Jayant Patil । अशोक चव्हाण म्हणत असतील, तर…; जयंत पाटलांचा मोठा दावा
- Abdul Sattar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
