Share

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन त्याच्या कानशिलात लगावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. क्रिस रॉकने सोहळ्यात विल स्मिथच्या पत्नीवर विनोद केल्यामुळे अभिनेत्याचा पारा चढला आणि थेट स्टेजवर जाऊन त्याने क्रिसच्या कानशिलात लगावली.

क्रिसने G.I. Jane सिनेमावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली. क्रिस म्हणाला, ‘G.I. Jane सिनेमात जेडाला टक्कल असल्यामुळे घेतलं होतं. पण जेडाने सिनेमासाठी टक्कल केलं नसून, तिला एक आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे Alopecia…. Alopecia मुळे केस सतत गळत असतात. म्हणून जेडाना स्वतःचं केस कापले आहेत. दरम्यान, पत्नीवर विनोद केल्यामुळे स्मिथ चिडला आणि त्याने शिविगाळ करत होस्ट क्रिसच्या कानशिलात लगावली.

सध्या स्मिथ आणि क्रिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिसच्या कानशिलात लगावल्यानंतर स्मिथ म्हणतो, ‘माझ्या पत्नीबद्दल पुन्हा असं बोलू नकोस…’ यावर क्रिस म्हणाला, ‘नाही बोलणार…’ सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : आज नव्या संघांमध्ये पहिली लढत; वाचा काय सांगते वानखेडेची खेळपट्टी!

“…हे तुम्हाला दिसत नाही का?”, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपचा सवाल

सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला- संजय राऊत

ऑस्कर गोज टू…” ‘डय़ून’ चित्रपटाने पटकावले सर्वाधिक पुरस्कार,कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले

मधमाशी पालन व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!