Share

“…हे तुम्हाला दिसत नाही का?”, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर टीका करत थातूरमातूर आरोप आणि पेनड्राईव्ह हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे, असे वक्तव्य केले होते. यावरून आता भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मविआ सरकारवर टीका करण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हंटले आहे की,‘सुप्रिया सुळे तुम्हाला तुमचे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी मजबूर करत आहे, राज्यात आया बहिणी सुरक्षित नाहीत, सरकार मध्ये बसलेले ‘काही लोक’ हे एकतर आतंकवाद्यांचे हस्तक आहेत, नाहीतर बलात्कारी आहेत. हे तुम्हाला दिसत नाही का? कुचिकवर दोन शब्द तरी बोला?.’

दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की,‘केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष आरोप-प्रत्यारोप करत असून हे सर्व महागाई लपण्यासाठी केले जात आहे , असे मला वाटते. महागाई आणि परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार असे अनेक प्रश्न समोर असताना थातूरमातूर आरोप आणि पेनड्राईव्ह हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!