मुंबई : मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. जगभरात 9 लाख 92 हजार टनांचे मध उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे 33 हजार 425 टन मध काढला जातो. मध हा एक संपूर्ण आहार असून यामध्ये 70 ते 80 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. तसेच मधात 18 प्रकारचे अमिनो आम्लेही असतात. जे मानवी शरीराला निरोगी बनवतात.
80% मध औषध म्हणून वापरले जात आहे. सौंदर्यप्रसाधने आणि कन्फेक्शनरीमध्येही याचा वापर अधिक होताना पाहायला मिळतो.
कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात –
देशात मधमाशी पालनाचा व्यवसाय कमी खर्चात असल्याने वेगाने व्यवसाय वाढत आहे. याचा परिणाम भारतातून होणाऱ्या निर्यातीतून दिसून येतो. अपेडाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये भारताने 59,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त मध निर्यात केला. लहान, सीमांत आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. कमी खर्चामुळे त्यांना अधिक नफा मिळविण्यात मदत होईल. देशभरात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांमधून शेतकरी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेऊ शकतात. तसेच शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मदत तर करतातच पण या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे मार्ग दाखवतात.
महत्वाच्या बातम्या –


