Share

IPL 2022 : आज नव्या संघांमध्ये पहिली लढत; वाचा काय सांगते वानखेडेची खेळपट्टी!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज दोन नव्या संघांमध्ये सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाईल. यंदाच्या लीगमध्ये हे दोन्ही नवे संघ समाविष्ट करण्यात आले आहेत. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे, तर लखनऊ सुपर जायंट्सची कमान केएल राहुलकडे आहे.

यापूर्वी, वानखेडेवर २६ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव केला होता. गुजरात आणि लखनऊ यांच्यातील सामना हा आयपीएल २०२२ मधील चौथा सामना असेल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. आज सोमवारी दिवसभरात मुंबईचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर रात्रीच्या वेळी त्यात घट होईल.

वानखेडे हे असे मैदान आहे की जिथे जास्त धावसंख्या असलेले सामने पाहायला मिळतात. येथील संघ १८० पेक्षा जास्त धावा करतात. हे मैदान फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. येथे पहिल्या डावाची सरासरी १९४ धावांची आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी १८४ धावांची आहे. एकूणच नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!