🕒 1 min read
नवी दिल्ली: कोकणात राजकीयदृष्ट्या आजचा दिवस चांगलाच गाजणार आहे. कारण मविआ सरकारमधील तीन बडे नेते आज कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचे आगमन होणे महत्वाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण शिवसेनेचा बालकिल्ला आहे. आदित्य ठाकरे कार्यक्रमासाठी जात असून शिवसैनिक आणि सिंधुदुर्गामधील जनता त्यांचं स्वागत करेल”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजप नेते नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानभवनातील ‘म्यॅाव म्यॅाव’ प्रकरण असेल किंवा दिशा सालियन प्रकरण,अशा विविध प्रकरणात राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.आता त्यांच्याच मतदारसंघात दाखल होऊन आदित्य ठाकरे करार जवाब देणार का? असा सवाल आता केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
मधमाशी पालन व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात!
मविआ सरकारमधील तीन मंत्र्यांचा आज कोकणात ‘पॉलिटिकल शो’
“जाधवांनी पोच पावती, बिलं ही घेतले असेल?”, ‘त्या’ कारवाईवरून किरीट सोमय्यांची टीका
“आज देशात जे चित्र दिसत आहे, ते जर असंच राहिलं तर…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
“सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
