🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘बाबरी मस्जिदवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते. त्यामुळे बाबरी मस्जिदच्या वेळी फक्त हिंदू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्याच्या पलीकडे कोणी उपस्थित नव्हते’, असे सय्यद म्हणाल्या.
दरम्यान, पुढे भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर बोलतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘महागाई सारखे अनेक विषय असताना ते सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं जात आहे. तसेच देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला असून हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत.’
महत्वाच्या बातम्या:
- “आदित्यजी ‘या’ घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता”, केशव उपाध्येंचा टोला
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने…”, संजय राऊतांनी ट्वीट करत साधला निशाणा
- “…तर प्रेतं तरी बघायला येतील का?”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी..”, भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

