🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा केला होता. यावरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान असल्याचा टोला लगावला होता. यावरच भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
“आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा.”, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे
1/4— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 3, 2022
दरम्यान १८५७ च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर बाबत कोर्टाने निकाल चांगला दिला आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेला…”, बाबरी वादावरून केशव उपाध्येंचा टोला
- “…तर प्रेतं तरी बघायला येतील का?”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने…”, संजय राऊतांनी ट्वीट करत साधला निशाणा
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज”, संजय राऊत यांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

