🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या बाबरी कोणी पाडली? यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नसल्याचा दावा केला होता. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ ट्विट करत याबाबत पुरावा दिला होता. मात्र आता भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीका केली आहे.
“मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वावर पाणी सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेला अचानक हिंदुत्वाची आठवण येऊ लागली आहे. देवेंद्र फडवीस यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्यात शिवसेनेच्या भूमिकेचा पद्धतशीर पंचनामा केल्यानंतर आता शिवसेनेचे बोलघेवडे प्रवक्ते संजय राऊत यांनी तेव्हाच्या घटनाक्रमाबाबत वाऱ्यावरच्या वार्ता कथन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात ही घटना घडली तेव्हा शिवसेना नेते तिथे नव्हतेच अयोध्येतील हॉटेल तेव्हा भरतेली असल्याने त्यांना तिथे जागा मिळेना म्हणून त्यांना तंबूत राहण्यास सांगितले गेले. मात्र ही बाब समजताच त्यांना मागे परतण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे शिवसेनेचे प्रमुख नेते अयोध्येतून माघारी परतले. या घटनेचे सविस्तर विवरण शिवसेनेचा नवा मित्र असलेल्या काँग्रेसच्या मुखपत्रात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात देण्यात आले आहे. बाबरी पतनात शिवसेनेचा सहभाग जर तरचा होता, तर प्रत्यक्षात लाखो कारसेवकांनी तो ढाचा पाडला होता.”, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
#बाबरी_ढाचा_कोसळला_तेव्हा_शिवसेनानेते_कलकत्त्यामध्ये
मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वावर पाणी सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेला अचानक हिंदुत्वाची आठवण येऊ लागली आहे. काल देवेंद्र फडवीस यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्यात शिवसेनेच्या 1/4 pic.twitter.com/9GTYJuLwCy
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 2, 2022
दरम्यान शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल. बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपाच्या वतीने स्पष्ट केले की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे.’’ भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते. असा टोला संजय राऊत यांनी सामनातून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज”, संजय राऊत यांचा खोचक टोला
- “चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावलेत मग…”, संजय राऊतांचे थेट आव्हान
- “भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- “संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

