🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमृता फडणवीस यांना महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. या महाउत्सव प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात.’ या टीकेवर उत्तर अमृता फडणवीसांनी मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात. पण आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे, असे म्हणत टीका केली. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या टीकेवर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘देवेंद्र फडणवीस आता माजी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांचे सगळे व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी दुसऱ्यांकडे किती पैसे आहेत याकडे ढुंकून बघण्याची गरज नाही. त्यांनी न बोललेलंच बर त्यांना जर पुन्हा यायचं असेल तर त्यांनी त्यांचं तोंड बंद ठेवाव’, असा टोला सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.
दरम्यान, ‘मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्त आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात’, असे अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देत म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
- “…तेव्हा फडणवीस तर पळतांना दिसले”, बाबरी वादावरून दिपाली सय्यद यांची टीका
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने…”, संजय राऊतांनी ट्वीट करत साधला निशाणा
- “…तर प्रेतं तरी बघायला येतील का?”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी..”, भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावर दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

