मुंबई :‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात तुफान चर्चा चालू आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहणार आहे. यासाठीच या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचं राज ठाकरेंच्या मनसेनं ठरवलं आहे..
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. कश्मीर फाइल्स या हॅशटॅगसहीत संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. २४ मार्च २०२२ मध्ये संध्याकाळी सव्वा सात वाजता माहीममधील एल. जे. रोडवरील सिटी लाईट चित्रपटगृहामध्ये हा शो दाखवला जाणार आहे,” असं या फोटोमध्ये म्हटलं आहे.
#kashmirifiles pic.twitter.com/hYcZZpkweB
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 22, 2022
मनसेतर्फे दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या शोची मोफत तिकीटं दादरमधील हेदक्करवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये उपलब्ध असतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तसेच या तिकीटांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही संदीप देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :


