कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या पाश्वर्भूमीवर कॉंग्रेस भाजपमध्ये आपापसात टीका होण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना तसंच काँग्रेसवर जोरदार टीका केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोल्हापुरच्या सात जागा पैकी पाच वेळा शिवसेना आणि दोन वेळा काँग्रेस जिंकली. त्यातून ही जागा काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचा कार्यकर्ते हतबल, नाराज, अस्वस्थ आहेत. या निवडणुकीत अस्वस्थ शिवसैनिकांना आपल्याला हवं ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस कायमची तुमच्या मानगुटीवर बसेल. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे,” अशी आक्रमक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

