मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या कारवायांचे सत्र सुरुच आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
https://youtu.be/rTB_HLBAgKg
“आगे आगे देखिए होता है क्या! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या!” अश्या आशयाचं पाहिलं ट्विट राणेंनी केलं आहे. तर “आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!”या शब्दात नारायण राणे यांनी दुसरं ट्विट केल आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

