Share

खतांची दरवाढ मागे; ‘केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा’, प्रीतम मुंडेंकडून स्वागत

Published On: 

बीड : रासायनिक आणि मिश्र खतांच्या अत्याधिक दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य देत खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती, ही दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर,राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांचे आभार मानले आहेत.

पेरणीपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उद्भवण्याची चिन्हे होती.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे खूप खूप आभार असे म्हणत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर केंद्र सरकारने घेतलेल्या दिलासादायक निर्णयाबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!