Share

‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळाचा या जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करत जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे.

रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं.

मी स्वत: फोटोग्राफर आहे
जास्त फिरत बसण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!