🕒 1 min read
नवी दिल्ली : ऐन कोरोना महामारीच्या संकटकाळात जपान व ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबत लवचिक पुरवठा साखळी कायम ठेवत उत्तम भागीदारीच्या जोरावर भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. आगामी काळात अर्थव्यवस्थेला धोक्याच्या बाहेर आणण्यात भारत यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचा भारत सामना करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
‘निक्की’ संस्थेद्वारे आयोजित २६ व्या ‘आशियाचे भवितव्य’ या विषयावरील ऑनलाईन संमेलनास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या उद्रेकामुळे परस्परांमधील विचारसरणीत बदल झाला आहे. त्यामुळे जगाचा चेहरामोहरा बदलला आहे; पण जगभरात विश्वसनीय पुरवठा शृंखलेची गरज, विश्वास आणि पारदर्शकतेचे महत्त्व वाढले आहे. अशा काळात वैश्विक क्षमता वृद्धिंगत झाली पाहिजे. तरच आपण कोरोना महामारीच्या आव्हानाचा कणखरपणे सामना करू शकू, असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण ताकद पणाला लावून परिस्थितीशी दोन हात केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनाची भागीदारी, तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि दळणवळण यात ‘क्वाड’ यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, युरोपियन युनियन व ब्रिटनची मुक्त व्यापार करारावरील चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना महामारीचे जगाला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असे सांगत भारत सध्या कठीण परिस्थितीला तोंड देत असल्याची कबुली त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
- शिवसेनेचे आमदार प्रदिप जैस्वाल एमआयएम खासदारासोबत गेलेच कसे ? खैरे संतापले अन्…
- पुण्याला दिलासा ; आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करू : गृहमंत्री वळसे-पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
