🕒 1 min read
मुंबई : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन ते जिल्हा प्रशासनाकडून याचा आढावा घेत आहेत.
त्यांच्या या दौऱ्याचे अनेक माध्यमे, वृत्तवाहिन्यांनी लाईव्ह प्रक्षेपण सुरू केले आहे. तसेच प्रत्येक घडामोडींची माहिती माध्यमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. याच अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे यांनी माध्यमांचा दाखला देत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘माध्यमांना देखील विश्वास नाहीये की मुख्यमंत्री घराबाहेर पडले. त्यामुळेच सतत ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे’ असा टोला राणे यांनी लगावला आहे.
माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.’
दरम्यान, रत्नागिरीतील आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, हेलिकॉप्टरमधून नाहीतर जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला देखील योग्य मदत करणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा विश्वास
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
